esakal | आसाम-मिझोराम सीमावाद हिंसाचारात सहा पोलिसांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Asam-Mizoram border issue

आसाम-मिझोराम सीमावाद हिंसाचारात सहा पोलिसांचा मृत्यू

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम यांच्या सीमावादात झालेल्या हिंसाचारात आसाम पोलिसांच्या सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मिझोराममधील नागरिकांनी आसामच्या हद्दीतील जागेवर अतिक्रमण केल्याच्या वादातून या नागरिकांनी सरकारी अधिकारी आणि पोलिसांवर हल्ला चढवला होता. (Six jawans of Assam Police lost their lives in Assam Mizoram border tensions aau85)

ईशान्येकडील आसाम-मिझोराम राज्यांचा सीमावाद आज (सोमवार) जोरकसपणे उफाळून आला. यातून दुपारी इथे दगडफेक आणि गोळीबार झाला होता. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. यावर शहा यांनी याप्रकरणी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि इथला सीमावाद सोडवण्याची सूचना केल्या होत्या.

पुण्याचे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी

या घटनेत भारतीय पोलीस सेवेतील आसाम केडरचे पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. निंबाळकर सध्या आसाममधील कचारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षकपदी कार्यरत आहेत, ते आपल्या टीमसह कचारा जिल्ह्यामध्ये बंदोबस्तावर होते. त्यावेळी मिझोरमकडील नागरीकांनी आसाम पोलिसांच्या दिशेने गोळीबार व जोरदार दगडफेक केली. त्यामध्ये बंदोबस्तावर असणारे निंबाळकर यांच्या दोन सुरक्षारक्षकांना गोळ्या लागल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. तर निंबाळकर यांच्यावर देखील गोळीबार झाला. सुदैवाने निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. निंबाळकर हे मुळचे बारामतीचे आहेत. निंबाळकर हे 2009 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) निवड झालेले ते सर्वाधिक तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर त्यांना प्राप्त झाल्यापासून ते आसामध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचा: विजय मल्ल्या दिवाळखोर घोषीत! संपत्ती ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी म्हटलंय, "मला सांगण्यास आतिव दुःख होतं की, आसाम-मिझोराम बॉर्डरवरील हिंसाचारात आसाम पोलिसांचे सहा शूर जवानांनी आपलं बलिदान दिलं. या जवनांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे."

आसाम पोलिसांनी सोमवारी आरोप केला की, "मिझोराममधील काही समाजकंटकांनी सीमेवरील आसाम सरकारच्या सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करत हल्ला चढवला. लैलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. येथील आसामच्या जमिनीवर मिझोरामकडील नागरिकांकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी आसाम सरकारचे अधिकारी बॉर्डरवर पोहचले होते." या दगडफेकीच्या घटनेचा व्हिडिओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी ट्विटरवर शेअर केला आणि तो गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केला. तसेच शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केली.

यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी देखील या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केला यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्तेक्षापाच्या विनंतीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी लक्ष घातलं आणि त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

loading image
go to top