काश्‍मीर एकाच दिवसात सहा दहशतवादी ठार

Representational image of Indian Army Jawan
Representational image of Indian Army Jawan

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये काल (गुरुवार) सहा दहशतवादी ठार झाले. बारामुल्ला येथील चकमकीत दोन, तर अनंतनागमध्ये चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. 

उत्तर काश्‍मीरमधील बारामुल्ला येथील अथुरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणाला वेढा घातला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही दहशतवादी स्थानिकच असल्याची माहिती मिळाली असली, तरीही पोलिसांनी अद्याप त्यांची ओळख जाहीर केलेली नाही. 

सायंकाळी दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग येथील अरवानी गावात सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. यातीलही एक दहशतवादी अरवानी गावातीलच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्य तीन दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

अरवानीमधील चकमक सुरू असताना गावातील काही तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com