अल कायदाशी संबंधित सहा दहशतवादी ठार 

पीटीआय
रविवार, 23 डिसेंबर 2018

श्रीनगर : सुरक्षारक्षकांनी आज जम्मू-काश्‍मीरमधील अवंतीपुरा भागात अल कायदाशी संबंधित संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना ठार मारत या संघटनेला मोठा हिसका दाखविला आहे. विविध दहशतवादी घटनांशी संबंधित असलेल्या या सहा जणांचा पोलिस अनेक दिवसांपासून तपास करत होते, असे काश्‍मीर रेंजचे पोलिस महानिरीक्षक स्वयंप्रकाश पनी यांनी सांगितले. 

मारले गेलेले दहशतवादी हे अल कायदाशी संपर्कात असलेल्या अन्सर गझवतुल हिंद या संघटनेचे सदस्य होते. झाकीर मुसा हा दहशतवादी या संघटनेचा म्होरक्‍या आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्यामुळे जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या विशेष पथकाने पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागाला वेढा घालत शोधमोहीम सुरू केली. वेढा आवळला जात असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही दिलेल्या प्रत्युत्तरात सहा दहशतवादी मारले गेले. पोलिसांची मात्र चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. 

सोलीहा महंमद अखून, फैझल अहमद खंदाय, नदीम अहमद सोफी, रसिक मीर, रौफ मीर आणि उमर रमझान अशी या दहशतवाद्यांची नावे असून, ते सर्व पुलवामामधील त्राल भागातीलच रहिवासी होते. या सर्वांवर सुरक्षा जवानांवर हल्ले करणे आणि नागरिकांवर अत्याचार करण्याचे आरोप होते. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वैद्यकीय आणि कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर या सर्वांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
Web Title: Six terrorists killed of Al Qaeda