सौंदत्ती तालुक्यातील सहा महिला हिरे नंदीजवळ अपघातामध्ये ठार

अमृत वेताळ
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

बेळगाव - थांबलेल्या उसाच्या ट्रकला पाठीमागून मोटारीची धडक बसली. गोकाक तालुक्यातील हिरे नंदीजवळ हा अपघात घडला या अपघातामध्ये सहा महिला जागीच ठार झाल्या तर दहा जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी पहाटे हिरे नंदीजवळ हा अपघात झाला असून सर्व मृत सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी आहेत. गोकाक येथील नात्यातील एका व्यक्तिचा अंत्यविधी उरकून परतत असताना हा  अपघात घडला.

गंगव्वा हुरळी (वय ३०), काशवा खंडरी (७०), यल्लव्वा पुजारी (४५), यल्लव्वा गुंडाप्पानवर (४०), रेणुका सोपडला (३४) व  मल्लव्वा खंडरी (५०) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की गोकाक येथे अंत्ययात्रेसाठी हे सर्वजण गेले होते. अंत्ययात्रा आटोपून परतत असताना हिरेनंदी येथे बंद पडलेल्या उसाच्या ट्रकला मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर यात दहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोकाक पोलिसांत नोंद झाली आहे.

Web Title: Six women in Saundatti taluka killed in an accident near Hire Nandi