esakal | Coronavirus : यूपीत १६ जिल्ह्यांत लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh

लॉकडाउन गांभीर्याने घ्या - योगी आदित्यनाथ
नागरिकांनी लॉकडाउन गांभीर्याने घ्यावे आणि संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहावे, असे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले. रविवारी गोरखपूरमध्ये त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या वेळीच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अकारण जमू नये, असे जनतेला उद्देशून बजावले होते. आपण अशा टप्प्यास आहोत, की जेथे किरकोळ चुकीचेही गंभीर नुकसान होऊ शकते, असे ते म्हणाले होते.

Coronavirus : यूपीत १६ जिल्ह्यांत लॉकडाउन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ - उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांत तीन दिवसांचा लॉकडाउन सोमवारपासून सुरू झाला. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात धाव घेतली. विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भाव वाढविल्याच्या तक्रारी आल्या. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’नंतर पोलिस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली. याविषयी लखनौचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी सांगितले की, नागरिकांना घरातच राहावे, असा संदेश १९० वाहनांतून ध्वनिवर्धकाद्वारे देण्यात आला. बॅंक आणि इतर अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखविल्यानंतर सोडण्यात येत होते. लोक विनाकारण भटकणार नाहीत, यादृष्टीने दक्षता घेतली जात होती.

Coronavirus : कनिका दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह!

राज्यातील लॉकडाउनचा हा पहिला टप्पा आहे. त्यात गोरखपूर, लखनौ, आग्रा, वाराणसी हे प्रमुख जिल्हे आहेत. या कालावधीत राज्य परिवहन मंडळाची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

मुंबई, सुरतमधून लोंढे
जौनपूर, मिर्झापूर, झाशी आदी जिल्ह्यांत मुंबई, सुरत अशा ठिकाणांहून लोकांचे लोंढे येत आहेत. तेथील प्रशासन अशा नागरिकांची यादी तयार करीत आहे. किरकोळ आजारी असलेल्यांनाही विलगीकरण कक्षात पाठविण्यात येत असून, मोफत उपचार दिले जात आहेत.

Coronavirus : देशातील अनेक राज्यांमधील व्यवहार थांबले

आंदोलन स्थगित
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महिलांनी हुसैनाबाद घंटाघरपाशी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. गेल्या ६६ दिवसांपासून तेथे निदर्शने सुरू होती.

loading image