एस. एम. कृष्णा घेणार हातात 'कमळ'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

काँग्रेसला सध्या माझी गरज उरलेली नाही. माझे वय झालेले असल्यामुळे पक्षाकडून माझ्याकडे दुर्लक्ष केले जात होते, असे म्हणत कृष्णा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम केला होता.

बंगळूर - काँग्रेसमधून बाहेर पडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज (शनिवार) याबाबत माहिती देताना सांगितले, की कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अद्याप प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही. तो लवकरच होईल. त्यांचा भाजपप्रवेश 100 टक्के निश्चित आहे.

काँग्रेसला सध्या माझी गरज उरलेली नाही. माझे वय झालेले असल्यामुळे पक्षाकडून माझ्याकडे दुर्लक्ष केले जात होते, असे म्हणत कृष्णा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम केला होता. त्यांनी त्यावेळी पुढील वाटचालीबाबत उत्तर देण्याचे सोईस्कररीत्या टाळले होते. आता त्यांचा भाजपप्रवेश निश्चित आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कृष्णा यांनी काम पाहिले आहे.

Web Title: SM Krishna has decided to join BJP, says B.S. Yeddyurappa, BJP Karnataka President