छोटी रकमेची चौकशी होणार नाही : जेटली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडालेली असताना छोटी रक्कम जमा करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिेले आहे. 

"छोटी रक्कम भरणाऱ्यांना प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा त्यांचा कसल्याही प्रकारचा छळदेखील होणार नाही. केवळ मोठ्या प्रमाणावर अघोषित उत्पन्न बाळगणाऱ्यांना अस्तित्वात असलेल्या कायद्यांनुसार चौकशीचा सामना करावा लागेल.", असे जेटलींनी एका परिषदेत सांगितले. 

लोकांना सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु भ्रष्टाचार, अघोषित संपत्ती आणि आर्थिक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जास्त मूल्याच्या नोटांवरील बंदीचा फायदाच होणार असल्याचे जेटली म्हणाले. 

बँकेत अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम भरताना या उत्पन्नाचा स्रोत बेकायदेशीर आढळल्यास प्राप्तिकरासह आणखी 200 टक्के कर दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. भरघोस प्रमाणात रोख रक्कम जमा करणाऱ्यांचा तपशील ठेवण्याचा बँकांना आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सराफांनादेखील मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे. 

Web Title: small amount depositor need not worry- jaitley