Small Charter Planes Safety : लहान चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करणे खरोखर धोकादायक आहे का?

Are small charter planes safe? जाणून घ्या, विमान प्रवासातील टर्बुलन्स म्हणजे नेमकं काय आणि लहान विमानांसाठी अधिक आव्हानात्मक का?
A small charter aircraft preparing

A small charter aircraft preparing

esakal

Updated on

charter flight safety : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने, विमान प्रवासाबद्दलच्या सुरक्षेबात चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. शिवाय, चार्टड विमानांमध्ये प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे, असेही प्रश्न निर्माण होत आहेत. कारण, प्रवासादरम्यान विमान अचानक नुसते हालले तरी प्रवाशांच्या हृदयाचे ठोके वाढतात. विशेषतः तेव्हा जेव्हा गोष्ट लहान चार्टर्ड किंवा खासगी विमानांची असेल, तेव्हा टर्बुलन्स म्हणजेच हवेचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवतात. यामुळे अनेकदा प्रश्न निर्माण होतो, की लहान विमानांमध्ये उड्डाण करणे सुरक्षित आहे का? 

विमान वाहतूक तज्ञांच्या मते, टर्बुलन्सचा  नेहमीच धोका नसतो, परंतु लहान विमानांमध्ये त्याचा परिणाम मोठ्या विमानांच्या तुलनेत जास्त जाणवतो, परंतु हे सर्व पूर्णपणे वैज्ञानिक कारणांशी निगडीत आहे.  टर्बुलन्स म्हणजे हवेच्या प्रवाहात अचानक बदल जाणवणे. जेव्हा वेगवेगळ्या वेगाचे आणि दिशांचे वारे एकमेकांवर आदळतात तेव्हा विमानाला टर्बुलन्सचा अनुभव येतो. याची मुख्य कारणे म्हणजे ढग आणि वादळ, पर्वतांवरील हवेची टक्कर, जेट स्ट्रीम आणि उष्ण व थंड हवेचे मिश्रण इत्यादी.

आता प्रश्न असा आहे की लहान चार्टर्ड विमानांना टर्बुलन्स जास्तप्रमाणात का जाणवते? कारण त्यांचे मूळातच त्यांचे वजन कमी असते. लहान विमाने मोठ्या प्रवासी विमानांपेक्षा खूपच हलकी असतात. त्यांचे वजन कमी असल्याने,  वाऱ्याचा वेग देखील विमानाला जास्त हलवू शकतो. दुसरे कारण म्हणजे छोट्या विमानाच्या पंखांचा विस्तार कमी असतो, त्यामुळे त्यांना मोठ्या विमानांच्या तुलनेत संतुलन राखणे थोडे अवघड होते.

A small charter aircraft preparing
Leaders Who Died in Air Crashes : विमान अन् हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले देशातील राजकीय नेते

तिसरे कारण म्हणजे कमी उंचीवर उड्डाण करण्याची आवश्यकता. कारण, बहुतेक चार्टर्ड आणि लहान विमाने १० हजार ते २५ हजार फूट उंचीवर उडतात, जिथे हवामानाचा जास्त परिणाम होतो, ढग आणि वारे अधिक अस्थिर असतात. याउलट, मोठे विमान ३५ हजार फूट किंवा त्याहून अधिक उंचीवर उडतात.

A small charter aircraft preparing
Plane Accident Averted : विमान दुर्घटना टळली! पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा थोडक्यात बचावले

छोट्या विमानांमध्ये प्रवास करणे धोकादायक आहे का? –

याबद्दल, विमान वाहतूक सुरक्षा तज्ञ म्हणतात की टर्ब्यूलन्समुळे  विमान अपघात होत नाही. खरा धोका सीट बेल्ट न बांधणे, अचानक धक्का बसणे आणि प्रवासी पडणे किंवा केबिनमधील सैल बांधलेले सामान यामध्ये आहे. बहुतेक दुखापती या टर्ब्यूलन्सवेळी उभ्या असलेल्या प्रवाशांना होतात, विमानाला नाही.

A small charter aircraft preparing
Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

खरंतर, प्रत्येक विमानाला  मग ते लहान चार्टर्ड जेट असो किंवा हेलिकॉप्टर, आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके, स्ट्रक्चरल स्ट्रेस टेस्ट आणि एक्स्ट्रीम शॉक सिम्युलेशनमधून जावे लागते. लहान विमाने अचानक, सामान्यपेक्षा जास्त टर्ब्यूलन्सचा सामना करण्यासाठी सुरक्षितपणे डिझाइन केलेली असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com