रामाच अस्तित्व न मानणारे आता रावणाला मानू लागले, इराणींचा काँग्रेसला टोला | Smriti Irani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi And Smriti Irani

रामाच अस्तित्व न मानणारे आता रावणाला मानू लागले, इराणींचा काँग्रेसला टोला

दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून तपास संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केला. आज सोमवारी (ता.१३) दिल्ली येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, राहुल गांधी (Rahul Gandhi) जामीनावर बाहेर आहेत. ९ कोटी रुपयांचे शेअर यंग इंडियाला दिले गेले. काँग्रेसचा संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केली. (Smriti Irani Attack On Rahul Gandhi Over Congress Party Agitation Against ED)

हेही वाचा: पंतप्रधान मोदी दौरा : तुकोबारायांचे मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद

आज ईडीविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे. नवी दिल्लीत तुम्ही कार्यकर्ते, नेत्यांना आज बोलवले आहे. कारण गांधी यांची संपत्ती वाचवायची आहे, असा हल्लाबोल त्यांनी गांधी कुटुंबीयांवर केला. २ हजार कोटी रुपये वाचवणे हा उद्देश आहे. सत्य राहुल गांधींच, ग्रह ही राहुल गांधींच, असा टोला त्यांना राहुल गांधींना लगावला. काँग्रेस पक्ष ९० कोटी रुपये एजीएलला कर्ज देते. ज्या पक्षाची स्थापना इंग्रजांनी केली, त्यांनी इंग्रजांवर टीका करु नये. यंग इंडियाने समाज सेवेचे काम केलेले नाही.

हेही वाचा: राहुल गांधी ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का; पक्षाच्या रॅलीवर बंदी

ईडीवर दबाव टाकून लोकशाहीचा सन्मान किती?, असा सवाल इराणी यांनी राहुल गांधींना केला. रामाच अस्तित्व न मानणारे आता रावणाला मानू लागले, असं त्या म्हणाल्या. अराजकता पसरवण्याच काम काँग्रेस करत असल्याचा त्यांनी आरोप केला. राहुल गांधींचा २ हजार कोटी रुपये वाचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही काळ्या धनाचा धंदा करावे आणि तपास संस्थांना डोळे झाकून घ्यावे हे शक्य नाही, असा प्रश्न गांधी कुटुंबाला त्यांनी विचारला.

Web Title: Smriti Irani Attack On Rahul Gandhi Over Congress Party Agitation Against Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top