राहुल गांधी ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का; पक्षाच्या रॅलीवर बंदी

National Herald Case
National Herald Caseesakal
Summary

काँग्रेस आज आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयापर्यंत रॅली काढणार आहे.

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) राहुल गांधी (Rahul Gandhi) आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. काँग्रेस ईडीसमोरील (ED) या प्रकरणाला मोठ्या राजकीय लढाईत रूपांतरित करण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस (Congress) आज आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयापर्यंत रॅली काढणार असून त्याद्वारे आपली राजकीय ताकद दाखवेल, अशी योजना आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) काँग्रेसच्या रॅलीला परवानगी नाकारलीय. दिल्ली पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्यामागं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगितलंय.

National Herald Case
के चंद्रशेखर राव भाजप-काँग्रेसला टक्कर देणार; लवकरच नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना

ईडीनं 2 जून रोजी राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. पण, परदेशात असल्यानं राहुल गांधींनी नंतरची वेळ मागितली होती. त्यानंतर त्यांना आज 13 जूनला हजर राहण्यास सांगण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार आणि काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) सदस्यांनाही रॅलीसाठी दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय. यासोबतच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com