स्मृती इराणी होऊ शकतात दिल्लीच्या मुख्यमंत्री? या कारणांमुळे दावा भक्कम

Who will be Delhi CM : आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाही.
स्मृती इराणी होऊ शकतात दिल्लीच्या मुख्यमंत्री? या कारणांमुळे दावा भक्कम
Updated on

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळाली. आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाही. मात्र अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजप घराणेशाहीच्या विरोधात असले तरी अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईक आणि अपत्यांना तिकीट दिलं होतं. पण घराणेशाही असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केलेलं नाही. त्यामुळे प्रवेश शर्मा यांचे नाव मागे पडत आहे. तर रेखा गुप्ता, शिखा रॉय यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र यात रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे. पण दिल्लीत केजरीवाल यांच्या तोडीस तोड असा चेहरा आणि महिला मुख्यमंत्री करायीच असेल तर स्मृती इराणी यांचं नाव चर्चेत येत आहे. राजकीय अनुभव, भाजपचा आक्रमक चेहरा आणि २०३० मध्ये केजरीवालांना पुन्हा चितपट करण्यासाठी स्मृती इराणी याचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको.

स्मृती इराणी होऊ शकतात दिल्लीच्या मुख्यमंत्री? या कारणांमुळे दावा भक्कम
पवार साहेबांची गुगली अनेकांना कळत नाही, पण मला कधी टाकणार नाहीत; शिंदेंची 'फिरकी'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com