स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण; तर तोमर यांच्याकडे नगरविकास

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

इराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत; तर तोमर यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सरकारमधील विविध मंत्रालयांच्या जबाबदारीसंदर्भात मोठा बदल घडण्याची शक्‍यता आहे

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे; तर गृह व नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नायडू हे या दोन्ही मंत्रालयांची जबाबदारी सांभाळत होते.

इराणी या सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत; तर तोमर यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सरकारमधील विविध मंत्रालयांच्या जबाबदारीसंदर्भात मोठा बदल घडण्याची शक्‍यता आहे.

सरकारमधील संरक्षण व पर्यावरण ही मंत्रालयेही सध्या रिक्त असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण; तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.

Web Title: Smriti Irani gets I&B ministry, NS Tomar given urban development ministry