‘मुंबईचं वैभव गिळायचं आहे, हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन’

Uddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statement
Uddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statementUddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statement

मुंबई : गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य अंधेरी पश्चिम येथील कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यामुळे सकाळपासून वाद पाहायला मिळत आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Uddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statement
Rashtrapatni Remark : सोनिया गांधींच्या प्रश्नाला रमा देवींचे उत्तर; तुमची...

आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत बसले असले तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे, असे ते म्हणाले. याचे कारण म्हणजे पैसा. हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघडपणे सांगितले आहे. अनवधानाने का होईना त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना मुंबईचे वैभव व पैसा गिळायचं आहे. हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

आजच्या पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निमित्याने त्यांनी शिंदे गट व भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. दिल्लीत बसले असले तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे, असे म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. केंद्र सरकारचे लक्ष मुंबई व महापालिकेवर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या बोलण्यातून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com