'ज्यांच्या जावयाने शेतकऱ्यांची जमीन खाल्ली ते दुसऱ्यांच्या जमिनी काय वाचवणार'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

काँग्रेस एक बुडणारे जहाज आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की ते लोकांची मदत कशी करु शकतील ?

बडोदा- केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला. ज्यांचा जावई शेतकऱ्यांची जमीन खातो, तो इतर शेतकऱ्यांची जमीन काय वाचवणार, असा टोला त्यांनी लगावला. त्या बडोदामधील मोरबी येथील पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या. यावर्षाच्या सुरुवातीला राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने, याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. 

काँग्रसेने त्यांचा नेता कोण आहे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. ती एक व्यक्ती आहे की परिवार ? राजकारणात जेव्हा तुम्ही एका परिवारावर आंधळं प्रेम करता तेव्हा तुम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे दुःख समजू शकत नाही. कारण काँग्रेस एक बुडणारे जहाज आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की ते लोकांची मदत कशी करु शकतील ? असे म्हणत ते सुटीवर कधी जातील हे कोणीच सांगू शकत नाही, टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष संसदेतही उपस्थित नव्हते. ते सुटीवर गेले होते. लोकांना जेव्हा गरज होती, तेव्हा ते तिथे नव्हते, अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. 

हेही वाचा- पंतप्रधानांना आणखी मजबूत सुरक्षा; अमेरिका पाठवतंय दुसरं VVIP विमान

जेव्हा पक्ष बुडायला लागतो, तेव्हा ते सुटीवर जातात. अशा पक्षाला आपले मत देऊन ते वाया घालवू नका. भाजपला समर्थन द्या, त्यांनी तुमची नेहमीच सेवा केली आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. तेव्हा राहुल गांधी संसदेत उपस्थित नव्हते, असा दावा त्यांनी केला. 

हेही वाचा- कलम ३७० येईपर्यंत दुसरा झेंडा घेणार नाही; मेहबुबा मुफ्ती यांचे वादग्रस्त विधान

ते स्वार्थी लोक आहेत. ते नेहमी शेतकऱ्यांबाबत बोलतात. परंतु, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि अमेठीचे माजी खासदार जेव्हा या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा संसदेत उपस्थित नव्हते. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smriti irani slams rahul gandhi and congress in gujrat by election