स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले

smriti irani
smriti irani

हल्दिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्राच्या योजनांच्या पोस्टरवर स्वत:ची छायाचित्रे लावल्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. बॅनर्जी स्वत:चा उल्लेख बंगालची मुलगी असा करतात. त्याचा संदर्भ घेऊन मतदार माता आणि जनतेवर हिंसाचार लादणाऱ्या अशा मुलीला मतदान करणार का, असा सवालही इराणी यांनी केला. 

त्यांच्या रॅलीत मंत्रिमंडळातील सहकारी धर्मेंद्र प्रधान सहभागी झाले होते. इराणी यावेळी म्हणाल्या,की ममतादीदी केंद्राच्या योजनांची नावे बदलून त्या आपल्या असल्याचा दावा करत आहेत. तृणमूलच्या सरकारमुळे पीएम-किसान योजनेसह केंद्राच्या इतर योजनांचे फायदे बंगालमधील गरीबांना मिळू शकले नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बंगालला आपली मुलगी हवीय,’ या तृणमूल काँग्रेसच्या घोषणेचाही स्मृती इराणी यांनी खरपूस समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या कल्याणासाठी दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, ममता बॅनर्जी केंद्रीय योजनांचे श्रेय लाटून छायाचित्रे काढण्यात गुंतल्या आहेत.
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com