महिला सन्मानाचा धर्माशी काय संबध? स्मृती ईराणी संसदेत भडकल्या

वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  •  बलात्काराच्या घटनेवरून स्मृती ईराणी आक्रमक
  •  विरोधकांवर निषाणा

नवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला उत्तर देताना स्मृती ईराणी या चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. चौधरींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला. त्यांनी महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी यापूर्वी असं कधी पाहिले नाही. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जातं. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असंही स्मृती ईराणी यांनी म्हटले आहे.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे

लोकसभेत महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका करताना एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जाणार आहे तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जाळण्यात आलं. त्यात ९५ टक्के पीडित युवती भाजली. देशात चाललंय तरी काय? उन्नावच्या घटनेत सरकार आणि पोलिस अपयशी ठरलेत असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना स्मृती ईराणी बोलत होत्या.

पाकिस्तानात उभे राहणार आंबेडकर भवन

दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महिला सुरक्षेसाठी कडक कायद्याची गरज असून अशाप्रकारचे गुन्हे थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी यावेत. सध्याच्या न्याय प्रक्रियेमध्ये कनिष्ठ न्यायालयापासून हे सुरु होतं. अनेक खटले वर्षोनुवर्ष सुरुच राहतात. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभा अध्यक्षांनी समिती गठित करुन चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हैदराबाद बलात्कारातील आरोपींचा एन्काऊंटर असो वा उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीला जाळण्याचा प्रकार असो, देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना याबाबत संसदेतही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smriti irani targets over opposition for debate on rape incidents