स्मृती इराणींनी चप्पल दुरुस्तीचे दिले 100 रुपये

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कोइमतूर : चप्पल दुरुस्त करणाऱ्या चांभाराला केंद्रीय कपडा मंत्री स्मृती इराणी यांनी दुरुस्तीची किंमत म्हणून चक्क शंभर रुपये दिले. वास्तविक त्या चांभाराने केवळ दहा रुपयांचीच मागणी केली होती. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

ईशा फाउंडेशनच्या एका कार्यक्रमाला आल्यानंतर स्मृती इराणी यांची चप्पल तुटली, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. इशा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला जात असताना त्या वाटेतच चांभारालाही शोधत होत्या. त्यानंतर त्या तमिळनाडू भाजपच्या महासचिव वनाथी श्रीनिवासन यांच्याबरोबर चांभाराकडे गेल्या आणि त्यांनी चप्पल दुरुस्तीला दिल्यानंतर त्या तेथील स्टुलावर बसल्या.

चप्पल दुरुस्तीनंतर चांभाराने दहा रुपये मागितले तर इराणी यांनी शंभर रुपये काढून त्याला दिले आणि सुटे परत करू नका असे सांगितले. वनाथी यांनी स्मृती इराणी काय म्हणाल्या त्याचे भाषांतर करून सांगितले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटिझन्सकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
Web Title: smruti irani pays 100 for work of 10 rupees