Snake Farming : असा देश जिथं होते सापांची शेती! सापांचा उपयोग तिथं फक्त...

सध्या सोशल मीडियावर एका बागेचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
Snake Farming
Snake Farmingesakal

Snake Farming Viral Video Vietnam Garden poison reptiles : तुम्ही आतापर्यत फळा फुलांनी भरलेल्या बागा पाहिल्या असतील. त्यात मनसोक्त फेरफटकाही मारला असेल. ते सगळे पाहून तुमचे मन प्रसन्न झाले असेल. सध्या सोशल मीडियावर एका बागेचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्याला कारणही तसेच आहे. त्या बागेतील झाडांवर तुम्हाला सगळे सापच दिसून येतील.

गावाकडील शेतात असणाऱ्या झाडांची, आमराईची, मोठमोठ्या बागेची सर ही काही शहरातल्या गार्डन टेरेसला येणारी नाही. घराच्या मागच्या जागेत फुलून येणारी बाग त्याची जागा याला असणारी मर्यादा पाहता अनेकांना वेगवेगळी फुलझाडं लावण्याचा मोह आवरावा लागतो. आता एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्या बागेतील झाडांवर फक्त सापच दिसून येत आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

आपण जे पाहतो आहे की ते खोटं आहे असा प्रश्न पडावा. अशा आशयाच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर दिल्या आहेत. जगातील एक देश असा आहे की, जिथे सापांची बाग आहे. तिथं काही कारणांमुळे सापांची शेतीही केली जाते. तुम्हाला हे वाचून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्या देशांत सापांना फार महत्व आहे. वेगवेगळ्या झाडांवर साप आढळून येतात. व्हिएतनाम मधील डोंग टँम मध्ये एक स्नेक फार्म आहे. जे पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोकं येतात.

त्या बागेमध्ये फक्त सापच दिसून येतात. व्हिएतनामच्या त्या गावांमध्ये सापांची शेती होती. ज्याप्रकारे शेतातून फळं, भाज्या यांचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे या बागेतून औषधांसाठी साप पाळले जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले जाते. त्या सापापासून विष काढून त्यापासून प्रतिजैविकं तयार करण्याचे काम केले जाते. डोंग टॅम स्नेक फार्मला दरवर्षी सात लाख पर्यटक भेट देत असल्याचे सांगण्यात येते.

Snake Farming
मंत्र्याच्या ताफ्यातील पोलिसाच्या गाडीची भर चौकात अॅम्ब्युलन्सला धडक; CCTV Footage Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं अनेकांची उत्सुकता वाढली आहे. बऱ्याचजणांना हे जाणून घ्यायचं आहे की, या भागामध्ये सापांची शेती कशी केली जाते. व्हिएतनाममधील ते स्थळ आता पर्यटनस्थळ झालं आहे. १२ हेक्टरमध्ये पसरलेल्या त्या शेतीमध्ये वेगवेगळ्या जातींचे साप ठेवण्यात आले आहेत. या जागी सापांच्या विषावर मात करणाऱ्या लसीची निर्मिती केली जाते.

Snake Farming
Video Viral : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात लहान मुलीला आईसमोर उचलून बाहेर फेकलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com