तमिळनाडूमध्ये एटीएममध्ये आढळला कोब्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

थनिरपंडल रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला एटीएममध्ये कोब्रा गेल्याचे दिसले. याची माहिती सर्पमित्राला देण्यात आल्यानंतर एटीएम खोलून कोब्राला पकडण्यात आले.

कोईंबतूर : तमिळनाडूमधील कोईंबतूरमधील थनिरपंडल रस्त्यावरील एका एटीएममध्ये चक्क कोब्रा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

थनिरपंडल रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला एटीएममध्ये कोब्रा गेल्याचे दिसले. याची माहिती सर्पमित्राला देण्यात आल्यानंतर एटीएम खोलून कोब्राला पकडण्यात आले.

एटीएममधील इलेक्ट्रीकल कॅबिनेटच्या मागे कोब्रा जाऊन बसला होता. चार फूट लांबीचा हा कोब्रा होता. त्याला जंगलात सोडून देण्यात आले. मंगळवारी केरळमध्ये मतदाना दरम्यान व्हीव्हीपॅट मशीनमध्ये साप आढळला होता.

Web Title: Snake Found Inside Tamil Nadu ATM