अरे तो 'कांदा' नाही तर...; व्हिडिओ व्हायरल, मिळाले लाखो व्ह्युज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरे तो 'कांदा' नाही तर...; व्हिडिओ व्हायरल, मिळाले लाखो व्ह्युज
अरे तो 'कांदा' नाही तर...; व्हिडिओ व्हायरल, मिळाले लाखो व्ह्युज

अरे तो 'कांदा' नाही तर...; व्हिडिओ व्हायरल, मिळाले लाखो व्ह्युज

मुंबई - सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडिओमध्ये जी क्रिएटीव्हिटी दाखवण्यात आली आहे त्यामुळे चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा ओघ व्हि़डिओवर सुरु आहे. सेलिब्रेशन कुठलं का असेना त्यावेळी सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो क्रिएटीव्हिटिचा अशीच एक अफलातून क्रिएटीव्हिटी समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियामुळे सध्या काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

बर्थ डे पार्टीमध्ये सेलिब्रेशन म्हटलं की, केक आलाच त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या आयडीया लढवताना दिसतात. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळतो. यावेळी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांनी लाईक्स केले आहे. त्याला कमेंट्सही दिल्या आहेत. कांद्याची प्रतिकृती तयार केली मात्र तो कांदा नसून केक असल्याचा तो व्हिडिओ आहे. सुरुवातीला चाहत्यांना तो केक असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात जेव्हा आपण तो पूर्ण व्हिडिओ पाहतो तेव्हा धक्का बसतो.

हेही वाचा: कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

एक आगळी वेगळी क्रिएटीव्हिटी यानिमित्तानं समोर आली आहे. त्याला चाहत्यांनी कौतूकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्यक्षात जेव्हा कांदा कापतानाची वेळ येते त्यावेळी तो केक आहे हे पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. ज्या शेफनं हा व्हिडिओ तयार केला आहे त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन वेगवेगळ्य़ा प्रकारचे क्रिएटिव्ह व्हिडिओ नेटकऱ्यांसाठी शेयर केले आहेत. त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडिओला देखील आतापर्यत पावणे दोन लाख व्हयुज मिळाले आहेत.

loading image
go to top