कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख
कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हे सध्या चर्चेत आले आहे. त्यांनी बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतला पाठींबा दिला. तिनं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असल्याचं वक्तव्य सांगितलं होतं. त्यामुळे गोखले यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. आपण आपल्या वक्तव्यार ठाम असून कंगना काहीही चूकीचं बोलली नाही. मी तिच्या पाठीशी आहे असं गोखले म्हणाले होते. यावर गोखले यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तरुणांना पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ य़ांच्याविषयी सांगितले होते. आपण ते कोण आहेत....आणि गोखले यांना कुलश्रेष्ठ यांच्या व्हिडिओची भुरळ का पडली हे जाणून घेणार आहोत.

2 डिसेंबर 1960 मध्ये उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यामध्ये पुष्पेंद्र यांचा जन्म झाला. मुस्लिम बहुल अशा वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे पालन पोषण हे देखील मुस्लिम कुटूंबामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये उर्दु भाषेचा उल्लेखही येतो. पुष्पेंद्र यांच्या शिक्षणाची सुरुवात उत्तर प्रदेशातच झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याच भागात झाले. पदवीधर शिक्षण अलीगढच्या विश्वविद्यालयातून त्यांनी पूर्ण केलं. त्यांची हिंदी बरोबर उर्दु, संस्कृत, इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व आहे. त्यांनी हिंदु धर्म, मुस्लिम धर्म, आणि सनातन धर्माचे अध्ययन केले आहे. आपल्या भाषणातून ते हिंदू धर्म, त्याची मांडणी, धर्मावर येणारे संकट याविषयी निरुपण करतात. त्याला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या भाषणांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आणि श्रोतृवर्ग मिळाला आहे.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. त्यामध्ये त्यांनी मोठं नाव कमावलं आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये एका न्युज चॅनेलसाठी काम केले आहे. त्याचबरोबर ते भारताच्या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या सेक्रेटरी जनरलपदी राहिले आहे. पत्रकारितेसाठी त्यांना भारताकडून ब्युरो चीफ म्हणून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. सध्या ते कॉग्रेसी विचारधारेच्या विरोधात राष्ट्रवादी विचारधारेच्या प्रचार प्रसाराचे काम कुलश्रेष्ठ करत आहेत.

loading image
go to top