निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेपास सोशल मीडियाला 'नो एंट्री'

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अर्जेंटिनातील सलटा येथे आयोजित जी-20 'डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअल'च्या बैठकीत रविशंकर प्रसाद बोलत होते. ते म्हणाले, भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल.

नवी दिल्ली : गेल्या काही निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाचा मोठा वापर होत असल्याचे समोर आले. त्यानंतर या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा गैरवापर होत असून, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मना कदापि परवानगी मिळणार नाही, असे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

अर्जेंटिनातील सलटा येथे आयोजित जी-20 'डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअल'च्या बैठकीत रविशंकर प्रसाद बोलत होते. ते म्हणाले, भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल. देशातील लोकशाही प्रक्रियेच्या शुद्धतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

तसेच सोशल मीडियातील माहितीचा निवडणूक प्रक्रियेमध्ये दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे अशा सोशल मीडियातील माध्यमांना कधीही परवानगी दिली जाणार नाही. या माहितीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रसाद म्हणाले.

Web Title: Social media platforms will not be allowed to abuse election