
Techie Murders Wife Then Commits Suicide Final Video Emerges
Esakal
एका ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत:लाही संपवलं. दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राममध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. सॉफ्टवेअर इंजिनअरचं नाव अजय कुमार असून त्यानं आत्महत्येआधी मित्राला व्हिडीओ मेसेज पाठवून टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.