Tirupati Accident: तिरुपतीला दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

Tirupati Accident: तिरुपतीला दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू

मुंबई : तिरुपती इथं बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तिरुपती येथील चंद्रगिरी इथं हा अपघात झाला आहे. (Solapur Four youths pilgrims died at Tirupati in road accident)

सुत्रांच्या माहितीनुसार, सोलापूर शहराच्या परिसरात राहणाऱ्या आठ ते नऊ जणांचा ग्रुप तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर हे सर्वजण तवेरा गाडीतून परतीच्या प्रवासाला निघाले होते. या प्रवासात तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळाजवळच्या एका गावाजवळ त्याच्या गाडी दुभाजकाला धडकल्यानं भीषण अपघात झाला.

हेही वाचा: Kasba Chinchwad By-Election: भाजपची रणनिती ठरली! 'या' लोकांवर सोपवली जबाबदारी

या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाल्याचं सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन समजते. या जखमींना तिरुपती इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.