Chandrayaan-3 : चंद्रावर बग्गीचा १०० मीटरचा प्रवास, विक्रम लँडर ज्या शिवशक्ती बिंदूजवळ...

आदित्य - एल१’मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सोमनाथ यांनी बग्गीच्या सफल कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘एक चांगली बातमी आहे. विक्रम लँडर ज्या शिवशक्ती बिंदूजवळ उतरले होते, तेथपासून प्रज्ञान बग्गीने चंद्राच्या पृष्ठभागावर आतापर्यंत १०० मीटर पूर्ण केले आहे.
chandryaan 3
chandryaan 3sakal

श्रीहरीकोटा - ‘‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान बग्गीचे काम सुरळीत सुरू आहे. बग्गीने चंद्राच्या पृष्ठभागावर १०० मीटर अंतर कापले आहे. चंद्रावर लवकरच रात्र होणार असल्याने लँडर व बग्गी निद्रावस्थेत ठेवले जातील,’’ अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शनिवारी दिली.

आदित्य - एल१’मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सोमनाथ यांनी बग्गीच्या सफल कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘एक चांगली बातमी आहे. विक्रम लँडर ज्या शिवशक्ती बिंदूजवळ उतरले होते, तेथपासून प्रज्ञान बग्गीने चंद्राच्या पृष्ठभागावर आतापर्यंत १०० मीटर पूर्ण केले आहे. चंद्रावर लवकरच रात्र होणार असल्याने त्यांचे काम थांबविण्याची प्रक्रिया एक-दोन दिवसांत सुरू करणार आहोत.’’

chandryaan 3
Solapur News : पस्तीस हजाराला विकलेला चिमुकला सापडला

चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांसमान आहे. विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला होता, त्यावेळी तेथे दिवस सुरू झाला होता. त्यामुळे लँडर व त्यातून बाहेर पडलेल्या प्रज्ञान बग्गीचे कार्य सुरू झाले होते. पण आता ५ ते ६ सप्टेंबरपासून तेथे अंधार पडायला सुरुवात होणार आहे.

chandryaan 3
Benefits Of vitamin D: फक्त कॅल्शियमच नाही तर मजबूत हाडांसाठी हे व्हिटॅमिन्सही आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या

‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’च कार्य योग्य प्रकारे सुरू आहे. वैज्ञानिक उपकरणांसह आमचा चमू खूप कष्ट घेत आहे.

- एस. सोमनाथ, अध्यक्ष ‘इस्रो’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com