esakal | काश्मीरमध्ये बंकर्स उद्धवस्त; जीवंत दहशतवादी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

soldier destroyed an underground hideout of lashkar e taiba in kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील लष्कराची मोहिम सुरू आहे. दहशतवाद्यांना लपण्यासाठी तयार करण्यात आलेले बंकर्स उद्धवस्त करण्यात आले असून, एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये बंकर्स उद्धवस्त; जीवंत दहशतवादी ताब्यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील लष्कराची मोहिम सुरू आहे. दहशतवाद्यांना लपण्यासाठी तयार करण्यात आलेले बंकर्स उद्धवस्त करण्यात आले असून, एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आले आहे.

भारतात 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांपासून धडक मोहिम सुरू केली आहे. यात दहशतवाद्यांच्या अनेक म्होरक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफने आज (शुक्रवार) केलेल्या कारवाईत लष्कर ए तोयबाची लपण्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली. दहशतवाद्यांना लपण्यासाठी भूमिगत बंकर्स तयार करण्यात आले होते. या कारवाईमध्ये शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून, एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
 

भारतीय जवानांनी काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत १० दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना चीन मदत करत आहे. पाकिस्तानातून 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.