esakal | भारतात 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

250 pakistani terrorist infiltration conspiracy china is helping them

भारत-चीनमधील तणाव सुरू असतानाच पाकिस्तानकडून तब्बल 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांना चीनची मदत मिळत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

भारतात 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारत-चीनमधील तणाव सुरू असतानाच पाकिस्तानकडून तब्बल 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांना चीनची मदत मिळत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

भारत-चीन सीमेवर चीनच्या खुरापती सुरू आहेत. भारतीय जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. चीन पाकिस्तानला मदत करत असून, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे. पाकिस्तान आणि चीनच्या कारस्थानांमुळे भारतासाठी डोकेदुखी वाढत आहे. भारतीय जवानांनी काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच चीन आणि पाकिस्तान मिळून कारस्थान रचत असल्याचे सांगितले होते. 10 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न लष्कराने उधळून लावला होता. मेजर जनरल अमरदीपसिंह औजल यांनी सांगितले की, उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचे जितके प्रयत्न होत आहे, तितकेच हिवाळ्यातही झाले. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न लष्कराने उधळून लावले आहेत.

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; दोन जवान हुतात्मा

दरम्यान, चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झाले तर लष्कर आणि वायुसेनाच महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे भारताने बीआर प्लॅन तयार केला आहे. बी म्हणजे भीष्म रणगाडा आणि आर म्हणजे राफेल फायटर जेट विमान. लडाखमध्ये 15 ते 17 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने भीष्म रणगाडे तैनात केले आहेत. चीनच्या टी-63 या टी-99 रणगाड्यांपेक्षा भारताचे रणगाडे जबरदस्त शक्तिशाली असल्याचेही सैन्याने सांगितले आहे. त्यामुळे जर चीननी युद्ध केले तर त्यांनाच जोरदार चपराक बसेल हे भारताच्या शस्रसिद्धतेमुळे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे या प्लॅनच्या आर भागासाठी भारतीय वायुसेना राफेल फायटर जेट विमानांसह सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून, त्यांचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतानी राफेल आणल्यावरच त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली होती.

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

भारत कोणत्याही हिंसेचे उत्तर तितक्याच ताकदीनी देईल हे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा कट पाकिस्तान रचत असून, त्यांना चीन मदत करताना दिसत आहे.