रिशी कुमारमुळे टळली संभाव्य जीवितहानी !

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

श्रीनगर : कुपवाड्यातील लष्करी छावणीवर हल्ला केल्यानंतर काही दहशतवाद्यांनी या छावणीत घुसखोरी करत भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, गनर रिशी कुमार यांच्या शौर्यापुढे मात्र त्यांना हार मानावी लागली. डोक्‍याला गोळी लागल्यानंतर जखमी झालेल्या रिशी कुमार यांनी दोन दहशतवाद्यांना टिपले, यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.

दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा रिशी कुमार हे पहारा देण्याचे काम करत होते, काही दहशतवाद्यांनी लष्करी छावणीमध्ये घुसखोरी करत कुमार यांच्यावर गोळीबार केला, या गोळीबारामध्ये त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली, पण बुलेटप्रूफ पटक्‍यामुळे मात्र त्यांचे संरक्षण झाले. पुढे काही क्षणांमध्ये सावध होत रिशी कुमार यांनी दोन दहशतवाद्यांचा वेध घेतला, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. बिहारच्या अरा जिल्ह्यातील रहिवासी असणारे कुमार मागील आठ वर्षांपासून लष्करामध्ये सेवेत आहेत. दरम्यान, कुपवाड्यातील लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये कॅप्टन आयुष यादव यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले होते.

जवानांना आदरांजली
श्रीनगर : कुपवाड्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या तीन जवानांना आज लष्कराकडून मानवंदना देण्यात आली, या वेळी कॉर्प्स कमांडर ले. जनरल जे. एस. संधू यांच्यासमवेत लष्करातील विविध रॅंकचे अधिकारी उपस्थित होते. या हल्ल्यामध्ये कॅप्टन यादव, सुभेदार गुज्जर, आणि नायक रामन्ना हे तिघेजण हुतात्मा झाले होते. कॅप्टन आयुष यादव हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी असून, तीनच वर्षांपूर्वी ते लष्कराच्या सेवेमध्ये रुजू झाले होते.

Web Title: soldier rishi kumar and terrorist fighting in kashmir