जवानांना स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळावी पण... : लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

''सोशल मीडिया वापरावर जवानांना रोखता येणार नाही. त्यांना सीमारेषेवर स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळावी. मात्र, त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने याचा वापर करावा. सध्याच्या अत्याधुनिक अशा संभाषण आणि माहितीच्या युगात भारतीय लष्करात सोशल मीडियाचा वापर व्हायला हवा''.

- जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख

नवी दिल्ली : लष्करातील जवानांना सीमारेषेवर स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळावी. मात्र, त्याचा वापर किती करावा, याचे गांभीर्य संबंधित जवानांना असावे, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले. 

'सोशल मीडिया आणि आर्म्ड फोर्सेस' या विषयावर लष्करप्रमुख रावत बोलत होते. भारतीय लष्करातील जे जवान अद्याप मोबाईल फोनचा वापर करत नाही, अशा जवानांबाबत लष्करप्रमुख रावत यांनी हे विधान केले. ते म्हणाले, सोशल मीडिया वापरावर जवानांना रोखता येणार नाही. त्यांना सीमारेषेवर स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळावी. मात्र, त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने याचा वापर करावा. सध्याच्या अत्याधुनिक अशा संभाषण आणि माहितीच्या युगात भारतीय लष्करात सोशल मीडियाचा वापर व्हायला हवा, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldiers should get access to social media within line of control says Army Chief Rawat