गॅस महागल्यानं चुलीसाठी लोकांनी पळवले जे.पी. नड्डांच्या सभेचे होर्डिग्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda

गॅस महागल्यानं चुलीसाठी लोकांनी पळवले जे.पी. नड्डांच्या सभेचे होर्डिग्ज

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा (UP Assembly Election 2022) निवडणुका जवळ येताच मोर्च्यांचा हंगाम सुरू झाला आहे. या रॅलींचा राजकीय पक्षांना (Political Party) कितपत फायदा होईल, हे मार्चमध्ये कळेल, मात्र तत्पूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मंगळवारी पार पडलेल्या रॅलीनंतर (Political Rally) मौदानातील होर्डिंग (Rally Hording) उखडून नेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी हापूर येथील गडमुक्तेश्वर येथे नड्डा यांचा मेळावा पार पडला होता त्या होर्डिंग उखडून नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. (JP Nadda Rally In UP)

हेही वाचा: नव वर्षात सरकारविरोधात एल्गार पुकारणार - मुनगंटीवर

आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या (Uttar Pradesh Election 2022) निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हापूर येथील गडमुक्तेश्वर येथे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून घरगुती सिलिंडरचे भाव 1000 रुपयांपर्यंत जावू पोहचले आहेत. यामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे.

हेही वाचा: खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

दरम्यान, नड्डा यांचा मेळावा पार पडल्यानंतर काही महिलांमध्ये मेळाव्यासाठी लावण्यात आलेले होर्डिंग घेऊऩ जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरात गॅस सिलिंडर आहे, मात्र त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे तसेच त्यासाठी 1000 रुपये मोजावे लागतात असे महिलांचे म्हणणे होते. काढून नेण्यात येणारे होर्डिंग स्टोव्ह पेटवण्यासाठी नेत असल्याचे अनेक महिलांनी यावेळी सांगितले. (Women Took Hording For Cook Food After Nadda Rally)

Web Title: Some Women Take Hoardings After Bjp Nadda Hapur Rally For Cook Food

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top