Spanish woman gang raped in Dumka: 'आमच्यासोबत जे घडलं...', सामूहिक बलात्कारानंतर स्पॅनिश महिलेने केली सोशल मिडीया पोस्ट

Spanish woman gang raped in Dumka: झारखंडमधील दुमका जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.
Spanish woman gang raped in Dumka
Spanish woman gang raped in DumkaEsakal

Spanish woman gang raped in Dumka: झारखंडमधील दुमका जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 300 किमी अंतरावर हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरातील कुरुमहाट येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली, जेव्हा स्पेनमधील एक पर्यटक जोडपे तंबूत रात्र विश्रांती घेत होते.

स्पॅनिश महिलेने इंस्टाग्राम पोस्टमध्ये या घटनेबद्दल लिहिले आहे की, आमच्यासोबत असे काही घडले आहे जे कधीही कुणासोबत घडू नये. माझ्यावर सात जणांनी बलात्कार केला आहे.

हे दाम्पत्य बांगलादेशातून दुचाकीवरून दुमका येथे पोहोचले आणि त्यांना बिहारमार्गे नेपाळला जायचे होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “या प्रकरणाचा तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. "एसआयटी (विशेष तपास पथक) तयार करण्यात आली असून, सर्व आवश्यक कायदेशीर तपास करण्यात येत आहेत," असे ते म्हणाले.

Spanish woman gang raped in Dumka
Jharkhand Crime News : स्पेनच्या पर्यटक महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार

काय म्हणाले अधिकारी?

अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुमकाचे पोलिस अधीक्षक पीतांबर सिंह खेरवार यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हंसदिहा पोलिसांच्या गस्ती पथकाला दोन लोक रस्त्याच्या कडेला दिसले. गस्ती दलाला जाणवले की, त्यांना काहीतरी झाले आहे. ते स्पॅनिश बोलत असल्याने ते काय बोलत आहेत हे पोलिसांना समजू शकले नाही. मात्र, त्याला काही उपचारांची गरज आहे, असे समजून पोलिसांनी त्याला स्थानिक रुग्णालयात नेले.

Spanish woman gang raped in Dumka
BJP Candidate List 2024: मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षाला भाजपने दिलं युपीमधून तिकीट, पण करावी लागणार कसरत

स्पॅनिश जोडप्याने डॉक्टरांना लैंगिक शोषणाच्या घटनेबद्दल सांगितले

अधिका-यांनी सांगितले की, स्पॅनिश जोडप्याने लैंगिक शोषणाची घटना डॉक्टरांना सांगितली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला शनिवारी पहाटे 1.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. आम्हाला माहिती मिळताच तपास सुरू करण्यात आला. आम्ही पीडितेशी बोललो. यावेळी आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले. आरोपींनी आणखी काही नावे घेतली. आम्ही एक टीम तयार केली असून इतर आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. याबाबत आम्ही फॉरेन्सिक टीम आणि सीआयडीचीही मदत घेत आहोत.

Spanish woman gang raped in Dumka
BJP Lok Sabha Candidates List 2024: अमित शाहांची चाणक्यनिती! पहिल्या यादीत खेळले सेफ 8 नवे डाव, भाजपला कसा होणार फायदा?

महिला आणि तिच्या पतीवर उपचार सुरू

दुमकाचे सिव्हिल सर्जन बाचा प्रसाद सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, २८ वर्षीय महिला आणि तिच्या ६४ वर्षीय पतीवर दुमका येथील फुलो झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, ते पोलिसांच्या एस्कॉर्टसह सुमारे 60 किलोमीटरचे अंतर कापून मोटरसायकलवरून सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले होते. सिव्हिल सर्जन म्हणाले, दोघेही धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीला किरकोळ दुखापत झाली आहे.

एक वैद्यकीय मंडळ पीडितेची वैद्यकीय तपासणी करेल, ज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अनुपरण पूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली तीन स्त्रीरोगतज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट, एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक दंतचिकित्सक यांचा समावेश असेल.

दरम्यान, अन्य एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या घटनेत सात ते आठ स्थानिक तरुणांचा समावेश आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.

Spanish woman gang raped in Dumka
Lok Sabha Election 2024 : हवामान बदल? गंभीर पाठोपाठ आणखी एका दिल्लीच्या खासदाराने ठोकला राजकारणास रामराम, सांगितलं कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com