Viral Video: पत्नी जावयाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Bihar News: यापूर्वी 2016 साली बिहारमध्येच एका महिलेने आपल्या जावयाशी लग्न केल्याची घटना घडली होती. नवीन जोडपे घरी परतल्यावर पाहून देवी यांची मुलगी बेशुद्ध पडली होती.
Son In Law And Mother In Law Gets Married In Bihar
Son In Law And Mother In Law Gets Married In BiharEsakal

बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे आणि अशी परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला आहे. असंख्य लोक ही घटना सामाजिक चौकटीत नैतिकदृष्ट्या शंकास्पद असल्याचे बोलत आहेत.

बंका येथून सून आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले.

आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही गर्दीसमोर एकमेकांचे प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर जावयाने जमावासमोर सासूला कुंकू लावले, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

छत्रपाल पंचायतीच्या हीर मोती गावामध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. (Son In Law And Mother In Law Gets Married In Bihar)

सिकंदर नावाच्या व्यक्तीचे लग्न झाले, त्याला दोन मुले झाली पण काही काळानंतर त्याची पत्नी मरण पावली. यानंतर त्याने दुसरे लग्न केले पण त्याचे दुसऱ्या पत्नीसोबतचे संबंध चांगले चालले नाहीत आणि दोघेही वेगळे झाले. मात्र, सिकंदर पहिल्या पत्नीच्या घरी येत-जात होता. सिकंदरचे सासूशी चांगले बोलणे होते.

त्यांच्या संवादाचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही. दोघांमध्ये प्रेम फुलले तेव्हा सासरच्या मंडळींना संशय आला.

मात्र, सासरे दिलेश्वर यांनी या नात्यासाठी खलनायक न ठरण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या संमतीनेच लग्न लावून देण्याचे मान्य केले.

Son In Law And Mother In Law Gets Married In Bihar
"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, दिलेश्वरने काही लोकांसोबत त्यांच्या संबंधांवर चर्चा केली आणि सिकंदरही आपल्या सासूला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार झाला. आधी सिकंदरने सासला समाजासमोर कुंकू लावले आणि नंतर न्यायालयात जाऊन लग्न केले आणि अशा प्रकारे सासू-जावई पत्नी-पत्नी बनले.

Son In Law And Mother In Law Gets Married In Bihar
Covishield Vaccine : कोव्हिशील्ड लस घेतली असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही; तज्ज्ञांच्या अहवालात दिलासादायक माहिती आली समोर

यापूर्वी 2016 साली बिहारमध्येच एका महिलेने आपल्या जावयाशी लग्न केल्याची घटना घडली होती. त्यावेळी 42 वर्षीय आशा देवी यांनी सूरज नावाच्या आपल्या जावयाशी न्यायालयात जाऊन लग्न केले होते. त्या न्यायालयातील वकील साक्षीदार बनले होते. नवीन जोडपे घरी परतल्यावर पाहून देवी यांची मुलगी बेशुद्ध पडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com