
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरुणाने आपल्या सासू-सासऱ्यांना चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.