फ्रिजमध्ये तीन वर्ष जतन करून ठेवला आईचा मृतदेह

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

शुभभ्रताच्या आईचे 2015 साली 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. तो लेदर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत असल्याने त्याने केमिकल्सचा वापर करून मृतदेहाचे जतन केले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचाही मृतदेह अशाचप्रकारे जतन करण्याची सोय त्याने घरात करुन ठेवली होती.

कोलकाता : आईच्या मृत्यूनंतर मुलाने तीन वर्ष तिचा मृतदेह फ्रिजमध्ये जतन करून ठेवला. ही धक्कादायक घटना घडली आहे कोलकाता येथील जेम्स लाँग सरनी या भागात. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी लगेचच मुलाला, शुभभ्रता मुझुमदार (वय 45) याला ताब्यात घेतले आहे. 

शुभभ्रताच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या मृतदेहावर कोणतेही अंत्यसंस्कार न करता, त्याने तो डीप फ्रिजमध्ये ठेवला. विशेष म्हणजे तीन वर्ष हा मृतदेह घरात असून कोणालाच संशय कसा आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   

शुभभ्रताच्या आईचे 2015 साली 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. तो लेदर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत असल्याने त्याने केमिकल्सचा वापर करून मृतदेहाचे जतन केले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचाही मृतदेह अशाचप्रकारे जतन करण्याची सोय त्याने घरात करुन ठेवली होती.

Web Title: A Son Kept Mother Dead Body In Freeze from 3 years