ऑनलाइन गेममध्ये ५० लाख गेले, दागिने चोरताना पाहिल्यानं आईला लेकानेच संपवलं; स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर वार

Uttar Pradesh Crime : ऑनलाइन गेमच्या व्यसनात अडकलेल्या मुलानं एका वर्षात ५० लाख रुपये गमावले. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढायला लागल्यानंतर मुलानं घरीच चोरी केली. त्यावेळी आईने पाहिल्यानं तिची निर्घृण हत्या केली.
Son Caught Stealing Kills Mother with Screwdriver After Losing Huge Sum in Online Game

Son Caught Stealing Kills Mother with Screwdriver After Losing Huge Sum in Online Game

Esakal

Updated on

ऑनलाइन गेममध्ये ५० लाख रुपये गमावले. त्यानंतर घरातलं सोनं चोरी करताना आईने पाहिलं. आपली बदनामी होणार या भीतीने मुलानं आईची स्क्रू ड्रायव्हरने भोकसून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केलीय. उत्तर प्रदेशात लखनऊतील रायबरेली रोड इथं ही घटना घडलीय. घरातलं सोनं चोरी करत असताना अचानक आई आली. निखिलला वाटलं की, आईनं चोरी करताना पाहिलंय. यानंतर त्याची आई ओरडत होती, जीवाची भीक मागत होती. पण नराधम तरुणाने स्क्रू ड्रायव्हरने तिची हत्या केली. डोक्यात सिलिंडर मारला आणि सोनं घेऊन घरातून पळून गेला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com