Indian Army : एकाच अकादमीतून सैन्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आई अन् मुलाची गोष्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lt. Rajat Ranjan

एकाच अकादमीतून सैन्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आई अन् मुलाची गोष्ट!

चेन्नई येथील OTA पासिंग आऊट समारंभातील एका मुलाची गोष्ट सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चिली जात असून, कारण याच अकादमीमधून 27 वर्षांपूर्वी या मुलाच्या आईने प्रशिक्षण पूर्ण करत देशसेवा केली होती. लेफ्टनंट रजत रंजन असे या मुलाचे नाव असून, त्यांची आई म्हणजेच मेजर (सेवानिवृत्त) स्मिता चतुर्वेदी या 1995 च्या बॅचच्या विद्यार्थी होत्या. एवढंच नाही तर, आता ले. रंजन हे त्यांच्या वडिलांच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले आहेत.

लेफ्टनंट रजत हे पहिले लष्करी अधिकारी आहेत, ज्यांची आईदेखील येथून उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळी अकादमीतून 125 पुरुष आणि 41 महिला कॅडेट उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याशिवाय भूतान आणि मालदीवमधील 28 परदेशी कॅडेट्सनीही प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा: सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी

नवीन पिढी आपल्यापेक्षा खूप पुढे

नि.मेजर स्मिता यांनी हा स्वतःसाठी एक अद्भुत क्षण असल्याचे म्हटले असून, नवीन पिढी आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. त्यांच्यासमोर अनेक नवीन आव्हाने आहेत, परंतु ते त्यांना तोंड देण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Son Passes Out Of Army Officers Training Academy 27 Years After His Mother

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :indian armyArmy jawan
go to top