सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी

आयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता.
सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी

Al-Qaeda Leader Killed In US Drone Strike : अल-कायदा (al Qaeda) प्रमुख अयमान अल-जवाहिरी (al-zawahiri) याला वयाच्या 71 व्या वर्षी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यामध्ये ठार केले. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर तब्बल 11 वर्षानंतर जवाहर मारला गेला असून, अमेरिकेने त्याच्यावर 25 दशलक्ष डॉलर्सचे बक्षील ठेवले होते. आयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता. अरबी आणि फ्रेंच भाषा बोलणारा जवाहिरी पेशाने सर्जन होता, वयाच्या 14 व्या वर्षी तो मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला. 1978 मध्ये त्याने कैरो विद्यापीठातील फिलॉसॉफीची विद्यार्थिनी अजा नोवारीशी विवाह केला.

सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी
अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार
  • जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहादीची (EIJ) स्थापना केली होती. या संघटनेने 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध केला होता. इजिप्तमध्ये इस्लामी राजवट प्रस्थापित व्हावी ही त्याची मागणी होती. 1981 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात याच्या हत्येनंतर जवाहिरीला अटक करून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले होते. इजिप्तमध्ये तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो सौदी अरेबियाला पळून गेला आणि वैद्यकीय विभागात प्रॅक्टिस करू लागला.

  • अल-जवाहिरीने 1985 मध्ये अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियामध्ये भेट घेतली. तेव्हापासून दोन्ही दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले. यानंतर 2001 मध्ये अल-जवाहिरीने EJI चे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले आणि दोघांनी जगाला हादरवून सोडण्याचा कट रचला.

सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी
बायडेन राष्ट्रपती व्हावेत! ओसामा बिन लादेनला का वाटायचं असं?
  • अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेची कमान हाती घेतली होती. 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला होता. जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जाते.

  • अमेरिकेचा आरोप आहे की 11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले. यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ टॉवर्सला धडकली होती. या हल्ल्यात 93 देशांतील 2977 लोकांचा मृत्यू झाला होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. ओसामा बिन लादेनला अल-जवाहरीने मदत केल्याचा आरोप अमेरिकेने केल्याचा आरोप अमेरिकेचा आहे.

सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी
भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर, अमेरिका-चीन आघाडीवर
  • अल-जवाहिरी नुकताच 71 वर्षांचा झाला होता. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर 11 वर्षांनी ओसामाप्रमाणेच दहशतवादी नेत्याला ठार मारले आहे.

  • 7 ऑगस्ट 1998 रोजी नैरोबी, केनिया आणि आफ्रिकेतील टांझानियामधील डार एस सलाम येथे यूएस दूतावासांसमोर जवळपास एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले होते यात 12 अमेरिकन लोकांसह 224 लोक ठार झाले आणि 4,500 हून अधिक जखमी झाले होते. यामागे जवाहर होता. ज्यात त्याला 1998 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

सर्जन ते जगातील सर्वात मोठा दहशतवादी; जाणून घ्या, अल जवाहिरीबाबतच्या 10 गोष्टी
ओसामा बिन लादेन हुतात्मा; इम्रान खान यांचं संसदेत खळबळजनक वक्तव्य
  • मे 2003 मध्ये सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये एकाच वेळी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात नऊ अमेरिकन लोकांसह 23 लोक मारले गेले होते. त्याच्या काही दिवसांनी एक टेप प्रसिद्ध झाली होती ज्यात जवाहिरीचा आवाज होता.

  • जवाहिरीचा ठावठिकाणा बऱ्याचा काळापासून गूढ राहिला होता. 2020 च्या उत्तरार्धापासून अल-जवाहिरीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, यूएन अॅनालिटिकल सपोर्ट अँड सॅन्क्शन्स मॉनिटरिंग टीमच्या अलीकडील अहवालाने जवाहिरी अफगाणिस्तानमध्ये राहत होता तसेच मुक्तपणे संवाद साधत असल्याची पुष्टी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com