अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोग ; अमेरिकेत उपचार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोग झाल्याचे निदान झाल्याचे आज (बुधवार) समोर आले. सध्या तिच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक सोनाली बेंद्रेने स्वत: टि्वटरवर जारी केले असून, यामध्ये तिने याबाबत सांगितले. 

सोनाली बेंद्रेने 'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'कल हो ना हो' या प्रसिद्ध चित्रपटात तिने भूमिका बजावली. तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे तिने आज स्वत: ट्विटरवर सांगितले. याबाबतचे पत्रक तिने प्रसिद्ध केले. यामध्ये तिने सांगितले, की ''मला कर्करोग झाल्याचे समजले. माझ्या या आजाराबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनपेक्षित आजार झाल्याचे समजले. ही बाब समजल्यानंतर माझे मित्रमंडळी मला भेटण्यासाठी येत आहेत. त्यांच्याकडून मला पाठिंबाही देण्यात येत आहे. या सर्वांमुळे मी आशीर्वादित झाल्याचे समजते. त्यामुळे या सर्वांचे धन्यवाद देते"'.   

Web Title: Sonali Bendre diagnosed with cancer