Sonam Kapoor Robbed | सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात चोरी, दीड कोटींचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonam kapoor and anand ahuja

सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात चोरी, दीड कोटींचा ऐवज लंपास

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Hosue of Sonam Kapoor Robbed)

हेही वाचा: Sonam Kapoor प्रॅग्नन्सीदरम्यान करतेय असं डाएट

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या दिल्ली येथील येथील घरी चोरी झाली असून दीड कोटीचा मुद्देमाल चोरांनी लुटला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर हिचे लग्न आणि सध्या सुरु असलेली प्रेग्नेंन्सी यामुळे ती चर्चेत आहे. नुकतेच तिने खास पोहोटोशूट करून घेतले आहे. सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: काय !!! रणबीर आलियाचे लग्न झालेही... 

चोरांनी रोकड आणि दागिने चोरले असून दिड कोटींना चुना लावला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, सोनम कपूरच्या सासूने (प्रिया अहुजा) तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी दरोडा पडल्याची तक्रार दाखल केली आहे. हे हायप्रोफाईल चोरीचे प्रकरण असून दिल्ली पोलिसांनी यात विशेष लक्ष घातले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या सोनम आणि आनंद यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक अहवालानुसार केअरटेकर, ड्रायव्हर, गार्डनर्स आणि इतर कामगारांव्यतिरिक्त एकूण 25 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. फक्त दिल्ली पोलीसच नाही तर 'एफएसएल' देखील या प्रकरणाचा शोध घेत आहेत. परंतु अद्याप दोषींचा शोध लागलेला नाही.

हेही वाचा: दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक...

सोनमने हे दागिने दोन वर्षांपूर्वी पाहिले होते. परंतु तिच्या आजेसासू सरला आहुजा (आजी) यांनी दावा केला आहे की, ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम पाहिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सोनम आणि आनंदच्या घरी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील संशयितांना ओळखण्यासाठी ते गेल्या वर्षभरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

Web Title: Sonam Kapoor Anand Ahuja New Delhi Residence Robbed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sonam kapoor