Sonam Kapoor प्रॅग्नन्सीदरम्यान करतेय असं डाएट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor diet plan during pregnancy

Sonam Kapoor प्रॅग्नन्सीदरम्यान करतेय असं डाएट

अभिनेत्री सोनम कपूरने आपण आई होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रेग्नेंसीबद्दल सोनमने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, प्रेग्नेंसीचे पहिले तीन महिने तिच्यासाठी किती कठीण होते. पण या काळात तिने योग्य काळजी, योग्य आहार आणि योगासने केल्याने तिला दिलासा मिळाला.

हेही वाचा: 'मधु का पांचवा बच्चा'; आधार कार्ड झालं व्हायरल

या मुलाखतीत सोनमने तिच्या डाएटविषयीही सांगितले. ती म्हणाली की मी, सकाळी नाश्त्यात डोसा खाते. तसेच उच्च प्रथिनेयुक्त आहार खाते. प्रॅग्नसीदरम्यान क्रॅश डायटिंग योग्य नसल्याचे तिने सांगितले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने करणे फायद्याचे आहे. सध्या सोनम इतर कामांपेक्षा स्वत:ला निरोगी ठेवण्यावर अधिक भर देत आहे.

हेही वाचा: व्हिडिओ गेम्स खेळल्याने होतो आरोग्याला फायदा! Exergaming विषयी जाणून घ्या

 Balance diet during pregnancy

Balance diet during pregnancy

पहिल्या तीन महिन्यातील आहार

भरपूर कॅल्शिअम असलेले पदार्थ खा

आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, अंजीर आणि कमी फॅट असलेले दूध घ्यावे.

शेंगा, हिरव्या भाज्या, धान्य, काजू आणि मासे खावेत. यामध्ये व्हिटॅमिन बी12, आयरन, ओमेगा 3 आणि फोलेट असल्याने ते शरीरासाठी फायद्याचे असते.

त्या त्या ऋतूत मिळणारी फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.

गर्भावस्थेत सफरचंद, डाळिंब, पेरू, बेरी आणि संत्री खाऊ शकता.

हेही वाचा: उंची वाढवायचीय? सकाळी 'ही' पाच आसने करा

कोणते पदार्थ खाऊ नका

जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाउ नयेत.

प्रोसेस्ड किंवा हवाबंद पदार्थही खाऊ नका.

मद्यपान, सिगरेट ओढणे या सवयींपासून दूर राहा.

जास्त प्रमाणात कॅफिन, कृत्रिम गोड पदार्थ, कच्ची अंडी, कच्चे मासे खाणे टाळा.

Web Title: Actress Sonam Kapoor Pregnancy Diet Workout And Fitness Tips For Tough First Three Months Pregnancy Period

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..