
मेघालायत पती राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंदौरच्या सोनमच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हनीमूनसाठी गेलेलं कपल बेपत्ता झालं होतं. त्यानंतर १९ दिवसांनी सोनम गाझीपूरमध्ये सापडली. सोनमला अटक झाल्यानंतर बरेच खुलासे झाले आहेत. राजाची हत्या झाली आणि त्यामागे पत्नी सोनम, तिचा प्रियकर राजसह तिघांचा हात आहे. मात्र अद्यापही काही प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यासाठी चौकशी केली जात आहेत.