Sonam Wangchuk arrest : वांगचुक यांच्या अटकेबाबत लडाखच्या डीजीपींचा खळबळजनक खुलासा ; पाकिस्तानचा उल्लेख अन् म्हणाले...

Ladakh DGP big statement : डीजीपींना या घटनेमागे परदेशी शक्तींचा हस्तक्षेपाच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले....
Ladakh DGP addressing the media with a major revelation on activist Sonam Wangchuk’s arrest.

Ladakh DGP addressing the media with a major revelation on activist Sonam Wangchuk’s arrest.

esakal

Updated on

Ladakh DGP Official Statement on Sonam Wangchuk arrest : लडाखचे डीजीपी एसडी सिंह जमवाल यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेचे समर्थन करत, एक मोठ आणि खळबळजनक विधान केलं आहे. प्रेस ब्रीफिंगमध्ये जमवाल यांनी सांगितले की, २४ सप्टेंबर रोजी केंद्रासोबत होणाऱ्या चर्चेआधी ‘’कथित पर्यावरणवादी कार्यकर्त्या’’च्या भडकाऊ भाषणामुळेच हिंसाचार भडकला. 

याशिवाय डीजपींनी आरोप केला की, कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीच चर्चेची सुरू असलेली प्रक्रिया बिघडवण्याचं काम केलं आहे. या हिंसाचारात जवळपास पाच ते सहा हजार लोकांनी शासकीय कार्यालये आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले केले. तर या दरम्यान चारजणांचा मृत्यूही झाला आणि मोठ्या संख्येत नागरिकांसह पोलिस व अर्धसैनिक दलाचे जवान जखमी झाले आहेत.

डीजीपी जमवाल यांनी असेही म्हटले आहे की, २४ सप्टेंबर रोजी दुर्दैवी घटना घडली. चौघांचा मृत्यू झाला आणि मोठ्याप्रमाणात लोक जखमी झाले. काही तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि यात सर्वात मोठ नाव सोनम वांगचुक आहे, ज्यांनी आधीही अशाप्रकारची भडकाऊ विधानं करून प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Ladakh DGP addressing the media with a major revelation on activist Sonam Wangchuk’s arrest.
Sadabhau Khot VIDEO : सदाभाऊंना करावा लागला शेतकरी अन् ग्रामस्थांच्या रोषाचा सामना; पाहणी न करताच घेतला काढता पाय!

परदेशी कनेक्शनचा तपास –

ज्यावेळी डीजीपींना या घटनेमागे परदेशी शक्तींचा हस्तक्षेपाच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, तपासात आणखी दोनजण पकडण्यात आले आहेत, ते कोणत्या षडयंत्राचा भाग आहेत का, हे आताच सांगणं कठीण आहे. या ठिकाणी नेपाळी कामगार काम करत होते, त्यामुळेच चौकशी आवश्यक आहे. तसेच, कर्फ्यू दोन टप्प्यात शिथील करण्याची योजना असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Ladakh DGP addressing the media with a major revelation on activist Sonam Wangchuk’s arrest.
Yogi Adityanath Strict Warning: 'मौलाना भूल गया कि यूपी में किसकी सरकार है' ; योगींचा उपद्रवींना कडक इशारा!

जमवाल यांनी म्हटले की, तपासकर्ते संभाव्य पाकिस्तानी संबंधाबाबत तपास करत आहेत. त्यांनी वांगचुक यांचे मागील काळातील परदेश दौरे आणि इस्लामाबाद येथील अधिकाऱ्यांसोबत कथित चर्चेकडे इशारा केला. तसेच, त्यांनी दावा केला की, योजना आणि समन्वयाचे काम आधीपासून झाले होते आणि यावर भर दिला की पुढे तणाव वाढू नये यासाठी अटक आवश्यक होती.

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रयी सुरक्षा कायदा अर्थात (NSA) अंतर्गत अटक करून जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी लडाखमध्ये अटक केल्यानंतर काल रात्री जोधपूर तुरूंगात नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com