Sonam Wangchuk : सोनम वागंचुक यांना अटक; लडाख हिंसाचारात चार जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांची मोठी कारवाई

Ladakh Violence : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरु केले होते. त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि यात चार जणांचा मृत्यू झाला.
Police detain activist Sonam Wangchuk in Leh after Ladakh statehood protests turned violent, leaving four people dead.

Police detain activist Sonam Wangchuk in Leh after Ladakh statehood protests turned violent, leaving four people dead.

esakal

Updated on

Summary

  1. लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला.

  2. मृत्यूच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली.

  3. वांगचुक दुपारी पत्रकार परिषद घेणार होते, पण त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. लेहमध्ये बंददरम्यान लडाखला राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या निदर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. सोनम वांगचुक आज दुपारी २:३० वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com