Sonam Wangchuk Reacts to Dharmendra Pradhan's Resignation
esakal
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या घडामोडीवर प्रतिक्रिया देत याला लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे आणि त्यांच्या संयमाचे कौतुक केले.