'सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांचा दबाव, लोकशाहीच्या...', सोनिया गांधींचा घणाघात

Sonia Gandhi Allegations Social Media
Sonia Gandhi Allegations Social Media Team eSakal
Updated on

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावरून राजकीय प्रचाराचे मुद्दे मांडले जातात. तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि मंत्री एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात. कधी कधी धार्मिक वादाला देखील तोंड फुटल्याचं दिसतंय. त्यावरूनच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) या लोकसभेत आक्रमक झाल्या. सत्ताधाऱ्यांचा सोशल मीडियावर (Socail Media) दबाव असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे.

Sonia Gandhi Allegations Social Media
सोनिया गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पराभवानंतर घेतला मोठा निर्णय

काही राजकीय पक्ष सोशल मीडियाचा दुरुपयोग करून सामाजित सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. सोशल मीडियामुळे आपली लोकशाही धोक्यात आली आहे. राजकीय पक्ष आणि नेते फेसबुक आणि ट्विटरचा दुरुपयोग करतात. जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना सारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत नाही हे वारंवार निदर्शनास आलं आहे, असा गंभीर आरोप देखील सोनिया गांधींनी केला आहे. त्या लोकसभेत बोलत होत्या.

सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने फेसबुकद्वारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे, हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. तरुणांच्या मनात द्वेषपूर्ण भावना निर्माण केल्या जात आहे. याबाबत जागतिक सोशल मीडिया कंपन्या फेसबुक आणि ट्विटरला जाणीव आहे. पण, या कंपन्या यामधून पैसे कमावण्याचे काम करत आहेत, असा आरोपही सोनिया गांधींनी केला.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणात फेसुबक आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांचा पद्धतशीर प्रभाव आणि हस्तक्षेप संपवण्याची मी सरकारला विनंती करते. हे पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. सत्तेत कोणीही असो, आपण आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपले पाहिजे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

यापूर्वीही राहुल गांधींनी ट्विटरवर गंभीर आरोप केले होते. माझे ट्विटर फॉलोअर्स कमी होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर आज सोनिया गांधींनी सोशल मीडियावर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून एका विशिष्ट समाजाच्या महिलांना टार्गेट केले होते. त्यांची एका अॅपवरून बदनामी केला जात होती. त्याचा प्रचार करण्यासाठी ट्विटरचा वापर केला जात होता. तसेच यापूर्वीही सोशल मीडियावरून तरुणांच्या मनात द्वेषपूर्ण भावना निर्माण केल्याचा आरोप झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.