'काँग्रेसने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा अपमान केला तर मोदींनी त्यांना सन्मान दिला'

Congress, former pm narasimha rao
Congress, former pm narasimha rao

हैदराबाद : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींसह अन्य दिग्गज काँग्रेसी नेत्यांच्या भूमिकेवर देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या नातवाने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. तेलंगणातील भाजप प्रवक्ता एनवी सुभाष यांनी काँग्रेस पक्षाने  नरसिंह राव यांच्या योगदानाकडे दुर्लक्षित करुन त्यांचा अपमान केला आहे, असा आरोपही काँग्रेसवर केलाय. पी व्ही नरसिंह राव यांच्याप्रती अचानक जागृत झालेल्या प्रेमाच्या पार्श्वभूमीवर एनवी सुभाष यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलीय.  
 एनवी सुभाष यांनी यासंदर्भात एएनआयला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तेलंगाना प्रदेश काँग्रेस कमिटी पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्म शताब्दीचा दिखावा करत आहे. काँग्रेस पक्षाने त्यांचा वारसा कधीच गमावला आहे. पक्षाने त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन त्यांना अपमानित केले. कठिण परिस्थितीत त्यांनी देशाचे नेतृत्व केले याची आठवणही एनवी सुभाष यांनी करुन दिली.   

सोनिया गांधी आणि राहुल गांधी कोणी तरी दिलेल्या स्क्रिप्ट वाचून माजी पंतप्रधानांबद्दल आदर असल्याचा दिखावा करत आहेत. पीवी नरसिंहराव हे दक्षिण भारतातील असल्यामुळे आणि गांधी घराण्यातील नसल्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाने दुर्लक्ष केले, असा आरोपही एनवी सुभाष यांनी केला आहे. यापूर्वी शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांनी पी वी नरसिंह राव यांच्या योगदानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तेलंगणा काँग्रेसने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम राबवला आहे. यासंदर्भात सोनिया गांधींनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश पाठवला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या योगदानाचा उघडपणे उल्लेख करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. साहसी नेतृत्वाने देशाला संकटजन्य परिस्थितून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांचा पक्षाला अभिमान आहे, अशा शब्दांत सोनिया गांधींनी माजी पंतप्रधानांच्या योगदानावर भाष्य केले होते. यावर त्यांच्या नातवाने दिखावेपणाचा आरोप केला आहे.  

एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नरसिंह राव यांच्या योगदानची दखल घेतात. त्यांच्या कामाचे कौतुक करतात. मोदींनी 'मन की बात' तसेच सार्वजनिक ठिकाणच्या भाषणातूनही नरसिंह राव यांचे नाव आदरपूर्वक घेतल्याचे पाहायला मिळते. असा उल्लेख करत एनवी सुभाष यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com