

Sonia Gandhi’s Babri Masjid Statement Explained
esakal
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेबाबत केलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याची घटना दूरदर्शनवर पाहिल्यानंतर आपण भावूक होऊन रडलो होतो, असे सोनिया गांधी यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपने, 'काँग्रेसच्या हृदयात तेव्हाही बाबर होता आणि आजही आहे,' अशी टीका केली आहे. तसेच सोनिया गांधी यांनी ही घटना दूरदर्शनवर नेमकी कधी आणि कशी पाहिली, यावरही भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा