Sonia Gandhi Birthday : म्हणून वडिलांनी एड्विज अँटोनिया अल्बिना माईनोचे नाव ‘सोनिया’ ठेवलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi Birthday : म्हणून वडिलांनी एड्विज अँटोनिया अल्बिना माईनोचे नाव ‘सोनिया’ ठेवलं!

Sonia Gandhi Birthday : म्हणून वडिलांनी एड्विज अँटोनिया अल्बिना माईनोचे नाव ‘सोनिया’ ठेवलं!

फॅसिस्ट शिपाई स्टेफिनो मायनो आणि त्यांची पत्नी पावलो मायनो  यांच्या पोटी 9 डिसेंबर 1946 रोजी एक कन्यारत्न जन्माला आले. दिसायला गोरीगोमटी, अगदी गोंडस असणाऱ्या त्या लहानग्या परीचे नाव ‘एड्विज अँटोनिया अल्बिना माईनो’ असे ठेवण्यात आले.  ह्याच त्या आजच्या ‘सोनिया गांधी’. आज त्यांचा जन्मदिवस. आजच्या दिवशी एड्विज माईनो’च्या सोनिया कशा झाल्या हे पाहुयात.

सोनिया गांधी इटलीच्या. ज्याचा जन्म आजच्या दिवशी मारोस्टिकामध्ये झाला होता. लवकरच ही बातमी लुझियानामधील त्यांच्या गावात पोहोचली. नवजात मुलीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि परंपरेनुसार शेजारी त्यांच्या घराच्या दारावर आणि खिडक्यांना गुलाबी फिती बांधतात. काही दिवसांनंतर तिचे नामकरण एडविग अँटोनियो अल्बिना माइनो असे करण्यात आले. हे नाव सानियाच्या आजीच्या नावावरून ठेवण्यात आले. पण सोनियांचे वडील स्टेफानो यांना आपल्या मुलीचे नाव काहीतरी वेगळे ठेवायचे होते. आणि यामुळेच ते अँटोनियो सोनिया म्हणू लागले.

हेही वाचा: Gujarat Election Result 2022: मुस्लिमबहुल भागातही भाजपची मोठी झेप! जिंकल्या 19 पैकी 17 जागा

खरे तर सोनियांच्या वडिलांनी रशियाने केलेल्या उपकाराची परतफेड केली होती. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की सोनियाचा जन्म इटलीत झाला. मग रशियाचा काय संबंध आहे. तर, त्याचे असे आहे की, सोनिया गांधी यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धानंतर झाला होता. दुसऱ्या महायुद्धातील इतर इटालियन लोकांप्रमाणेच सोनियांचे वडील स्टेफानो हेही मुसोलिनीचे समर्थक बनले. आणि दुसर्‍या महायुद्धात त्यांच्या वतीने लढण्यासाठी सैन्याच्या 116 व्या विसेन्झा लीजनमध्ये त्यांचे नाव देखील लिहिले.

हेही वाचा: Sushma Andhare : गुजरातमध्ये खऱ्या अर्थाने आमचा विजय; सुषमा अंधारेंचं विधान चर्चेत

हे सैन्य साहस आणि धैर्यासाठी ओळखले जात असे. पण रशियन लोकांनी पहिल्याच हल्ल्यात ते नष्ट केले. सोनियांचे वडील आणि त्यांच्या काही साथीदारांनी रशियन नागरीकांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवला. रशियन महिलांनी त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली. 

अशा प्रकारे, त्या काळी रशियन लोकांच्या मदतीने जे काही इटालियन लोक त्यांचे प्राण वाचवू शकले. त्यांनी आपल्या मुलींची नावे रशियाच्या लोकांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच एडविग अँटोनियो अल्बिना माइनोचे नाव सोनिया असे करण्यात आले. 1956 मध्ये सोनियांच्या कुटुंबाने तो भाग म्हणजेच इटलीचा मारोस्टिका परिसर सोडला. आणि उत्तर इटलीतील ट्यूरिन येथे राहू लागले.

हेही वाचा: Fat Burning Exercises: हे सोपे व्यायाम करा अन् झटक्यात घालवा 'Butt Fat' ची समस्या

ऍन्टोनिया लहान असताना स्टेफिनो पाच वर्षांचा सश्रम कारावास भोगून रशियातून परतला आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्याने एखाद्या शहरात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर माईनो परिवार तुरिन प्रांतातल्या ऑरबेसेनो शहरात स्थलांतरित झाला. कारण सोनिया आणि तिच्या इतर दोन बहिणीही मोठ्या होत होत्या. कपडे घालण्यासाठी, खाण्यासाठी अन्न आणि राहण्यासाठी फादर स्टेफानो यांच्याकडे फारशी संपत्तीही नव्हती. ते छोट्या दगडाच्या घरात राहत होते. टुरिन हे औद्योगिक शहर होते. त्यामुळे त्या काळी अनेक लोक त्या शहरात नोकरीसाठी गेले होते. सोनियांचे वडील स्टेफानो हे खूप कष्टाळू व्यक्ती होते. पूर्वी गवंडीकाम केलेल्या स्टेफिनो यांनी तिथे गेल्यानंतर एक छोटासा कंस्ट्रक्शन बिझनेस उभा केला. आज पावलो माईनो त्यांच्या ऍलेसँड्रा आणि नाडिया या दोन मुलींसोबत ऑरबेसेनो मध्ये राहतात.

हेही वाचा: Sushmita Sen Fitness : भारताच्या पहिल्या मिस युनिव्हर्ससारखं फिट व्हायचंय; असा घ्या डाएट

सोनियांनी वयाच्या १३ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले. फ्लाईट अटेंडंट होण्याची अँटोनियाची इच्छा माईनो परिवाराच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. 1964 मध्ये त्या केंब्रिज शहरात बेल एजुकेशनल ट्रस्टच्या भाषा शाळेत इंग्रजी शिकण्यासाठी गेली. पुढच्या वर्षी ती वर्सीटी रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम वेट्रेस म्हणून काम करु लागल्या. इथेच तिची राजीव गांधींशी भेट झाली.