sonia Gandhi autobiography
esakal
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘Belonging: A Journey of Love’ अखेर वाचकांच्या भेटीला आलं आहे. हार्पर कॉलिन्स इंडियाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात सोनिया गांधी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते देशातील राजकीय घडामोडींपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध, त्यांची राजकीय विचारसरणी आणि संसदेतली वागणूक याबद्दलही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.