सोनिया रुग्णालयातून घरी

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज सर गंगाराम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सोनिया गांधी यांना दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुणकुमार बसू यांनी सांगितले, की सोनिया गांधी यांचा ताप उतरला असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोनिया गांधी यांना आज सकाळी साडेअकरा वाजता रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांना २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा सोनिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Sonia Gandhi discharged from hospital